नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक-पुणे महामार्ग (Nashik Pune Highway) असलेल्या सेंट झेवियर हायस्कूल समोर गोमांस घेऊन वाहतूक करणाऱ्या एका गाडी चालकाला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी (Hindutva Activitis) पकडल्यानंतर गाडीत असलेले गोमांस रस्त्यावर ठेवून संबंधित आरोपीला अटक करून कडक कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान या घटनेनंतर उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.
एमएच 15 डी एस 7845 या गाडीतून गोमांसची वाहतूक करण्यात येत होती. गाडी पकडल्यानंतर संतप्त नागरिकांनी गाडीची तोडफोड करत रास्ता रोको आंदोलन केल्याने एका बाजूची वाहतूक खोळंबली होती. संशयित आरोपी राहाता येथून भद्रकाली नाशिक (Nashik) येथे गोमांस घेऊन चालला होता.




