नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा (Kanbaai mata utsav) उत्सव मोठ्या हर्षोउल्हासात सिडको, अंबड, सातपूर व इंदिरानगर परिसरात साजरा केला जात असतो. कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी कुटुंबातील सदस्य घराकडे न चुकता येतात. अवघ्या दीड दिवसांचा हा सण प्रत्येक कुटुंबाला एकतेचा संदेश देत वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा देऊन जातो.
रविवारी स्थापन केलेल्या कानबाई मातेला सोमवारी मोठ्या उत्साहात पारंपारिक खानदेशी नृत्य व फुगडी खेळत निरोप देण्यात आला. श्रावण सरींच्या हजेरीने दरवर्षी कानबाई मातेला निरोप दिला जातो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने सर्वांची नजर पावसाकडे नजरा लागून होती. कष्टकरी शेतकऱ्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी कानबाई मातेला पावसाकडे साकडे घातले आहे.
या मिरवणूकीत शितल पाटील ,संगिता पाटील,सुरेखा नेरकर,विद्या पाटील,मनिषा माळी ,मंदाकिनी जाधव शोभना शिंदे रंजना चव्हाण, अनिता पाटील यांनी पारंपारिक कानबाईच्या गाण्यावर फूगड्या खेळत आनंद लूटला. यावेळी लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, महेश हिरे, पराग शिञे,सुदाम कोंबडे, छाया देवांग, निलेश ठाकरे, रत्नमाला राणे, सुलोचना माळी, शितल भामरे, प्रतिभा पवार, मनोज सोनवणे, देवा वाघमारे,संदीप जगझप.
तसेच, सुनील, जगझाप, भूषण राणे, ज्योती शिंदे, गौतम पराडे,अविनाश पाटील,तानाजी जायभाये, लक्ष्मण जायभाये, सुनील पाटील यशवंत नेरकर सह उत्सव समिती सदस्य रवी पाटील,नितिन माळी ,सुरेश सोनवणे,रविंद्र पाटील ,भगवान पाटील, प्रवीण मोरे, यशवंत नेरकर आदी उपस्थित होते,
कानबाई मिरवणुकीचे आयोजन रवी पाटील, नितीन माळी, रवींद्र पाटील, भगवान पाटील, सुरेश सोनवणे, प्रवीण मोरे, वसंत चौधरी, यशवंत नेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व कानबाई भक्तांना केळी व फराळ वाटप करण्यात आले. सिडको परिसरातील बहुसंख्य नागरिक सर्वजनिक मिरवणुकीत सहभागी होते.