Tuesday, June 16, 2026
HomeनगरAhilyanagar : रिकामटेक्यांकडून राजकारण; वैद्यकीय महाविद्यालयावरून पालकमंत्र्यांची टीका

Ahilyanagar : रिकामटेक्यांकडून राजकारण; वैद्यकीय महाविद्यालयावरून पालकमंत्र्यांची टीका

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहेत. पंतप्रधानांमुळे अहिल्यानगरला वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. जनतेने काहींना सर्व बाजुने नाकारले आहे, असे रिकामटेकडे वैद्यकीय महाविद्यालयाचे राजकारण करत आहेत, असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.

- Advertisement -

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिंडी सोहळ्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि दिंडी चालकांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर राजस्व सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री विखे म्हणाले की, राज्यातील इतर जिल्ह्यात ही वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जागेसाठी समिती स्थापन केलेली आहे. या समितीच्या अहवालानंतर महाविद्यालयाची जागेची निश्चती होणार आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. जिल्ह्यात दक्षिण-उत्तर असे विभाजन नसते.

शिवसेना (उबाठा) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर पालकमंत्री विखे म्हणाले, शिवसेना-मनसे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. भाजपचे सदस्य संख्या ही सर्वात जास्त आहेत. भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपला कोणीही एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. जनता भाजपबरोबर आहे. राऊत हे उबाठा संपवतील, अशी टिका केली.

भाजपसाठी अनेक इच्छुक
विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. त्यावर विखे म्हणाले की, भाजपमध्ये येण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींना कोणाला प्रवेश द्यायचा, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. प्रवेश दिल्यानंतर पक्ष संघटना अंमलबजावणी करते. आमदार तांबे यांच्याशी आपले या विषयावर कोणतेही बोलणे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचनामे सुरू
अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे प्रशासन पंचनामे सुरू केले आहेत. निश्चित आता आकडेवारी उपलब्ध नाही. लवकरच या आकडेवारी जाहीर होईल. जे वरिष्ठ पातळीवरून मदत दिली जाईल.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...