Friday, May 1, 2026
HomeनगरAhilyanagar : पेरणीसाठी धीर धरा !; कृषी विभागाचा सल्ला

Ahilyanagar : पेरणीसाठी धीर धरा !; कृषी विभागाचा सल्ला

1 जूननंतर वाफस्याचा अंदाज घ्यावा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस कोसळतांना दिसत आहे. यामुळं शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला होता. जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे. मात्र, शेतकर्‍यांनी आणखी पावसाची वाट पाहावी. 1 जूननंतर होणार्‍या वाफस्यानूसार पेरण्या कराव्यात. पुढे पावसाचा खंड पडल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होवू नयेत, यासाठी खरीप पेरणीची घाई करून नयेत, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

नगरसह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान झालं आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकर्‍यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही, तोपर्यंत पेरणी करता येणार नाही. तसेच पेरण्यासाठी शेतकर्‍यांनी घाई करून येत, जिल्ह्यात राहाता, श्रीरामपूर, अकोले तालुके वगळता उर्वरित सर्व ठिकाणी दमदार मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे. या तालुक्यामुळे मे महिन्यांत 150 मिली मीटर अथवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. अनेक ठिकाणी तलाव, ओढे भरून पाणी वाहतांना दिसत आहे. मात्र, त्यानंतरही शेतकर्‍यांनी पेरणी करण्याची घाई करून नयेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यातील विविध भागात आता मान्सून दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्यासह राहुरी तालुक्यातील दोन महसूल मंडळ वगळता, संगमनेरमधील काही मंडळे सोडून उर्वरित ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे की होतांना दिसत आहे. या पावसामुळे खरीप हंगामासाठी आशादायी चित्र निर्माण होतांना दिसत आहे. जिल्हाचा दक्षिण भाग हा कडधान्य पिकांसाठी पोषक भाग असून कडधान्यासाठी मान्सूनपूर्व पावसाची आवश्यकता असते. हा मान्सूनपूर्व पाऊस होतांना दिसत असल्याने यंदा जिल्ह्यात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याची आशा कृषी विभागाला आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...