Sunday, April 19, 2026
Homeमुख्य बातम्याNashik News : लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचा पंजाबला मदतीचा हात; पूरग्रस्तांना पाठवला...

Nashik News : लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचा पंजाबला मदतीचा हात; पूरग्रस्तांना पाठवला तब्बल चाळीस टन मोफत कांदा

लासलगाव | वार्ताहर | Lasalgaon

येथील कांदा व्यापारी असोसिएशनतर्फे (Lasalgaon Onion Traders Association) पंजाब व हरियाणा राज्यावर कोसळलेल्या असमानी संकटामुळे ओढवलेल्या परिस्थितीमुळे आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी माणुसकीचा एक हात म्हणून येथील कांदा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ४० टन अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा कांदा (Onion) पंजाब येथील फगवाडा गुरुद्वारा येथे मान्यवरांच्या उपस्थित मालट्रकने रवाना करण्यात आला आहे.

- Advertisement -

आज (रविवारी) सकाळी येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज कांदा संकुल आवारात मनमाड (Manmad) गुरुद्वाराचे जथ्थेद्वार बाबा रणजीत सिंग यांच्या उपस्थितीत कांदा खरेदीदारांच्या उपस्थितीत कांद्याने भरलेला ट्रक रवाना करण्यात आला. १६०० किमीचे अंतर पार करून मंगळवारी सायंकाळी हे माल ट्रक पंजाबला (Punjab) पोहोचणार आहेत.

यावेळी लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे सदस्य बाबा रणजीतसिंग यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे प्रत्येक कांदा व्यापाऱ्याने मदत म्हणून दिलेला कांदा त्यांच्या खळ्यावरून स्वखर्चाने राजेंद्र कराड व मंटी पंजाबी यांनी स्वतःच्या वाहनातन (Vehicle) बाजार समिती पर्यंत आणून पोहोचविला.

दरम्यान, यावेळी बाबा रणजीत सिंग, अमरजीत सिंग गिल ,सतपाल राजपूत, मनजीत सिंग सेखो, अवतार सिंग, राकेश पंजाबी, सचिन पंजाबी, यांच्यासह बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे ,ओम प्रकाश राका, मनोज जैन, नितीन जैन, अफजल शेख ,अनिल आब्बड, ओम चोथानी, संतोष माठा ,रोशन माठा, गोपी गोर, धनंजय शिंदे ,वृषभ राका, दत्तू खाडे, महावीर भंडारी, अमर ब्रम्हेचा, विलास जगताप ,मनीष सारस्वत, प्रशांत सुराणा, रवी शिंदे, दत्तात्रय खुर्दे, संदीप सिन्हा, राकेश शिंदे, मयूर बोरा, रफिक बागवान प्रमोद पाटील, संदीप उगले यांच्यासह कांदा व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

राज-का-रण : नाशिकच्या बदनामीची कोणी सुपारी घेतली आहे का?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकसारख्या शांत शहरात जातीय हिंसा भडकावण्याची प्रयोगशाळा म्हणून तर पाहिले जात नाही ना! सुजाण नाशिककरांनी याविषयी...