Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik News : लासलगाव पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारी जनावरे जप्त

Nashik News : लासलगाव पोलिसांकडून कत्तलीसाठी जाणारी जनावरे जप्त

पिकअपसह २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade wakad

आज सोमवार (दि.०८ डिसेंबर) रोजी रात्री २.३० वाजेच्या दरम्यान लासलगाव पोलिसांनी (Lasalgaon Police) पाठलाग करीत कत्तलीसाठी जाणारे सहा जनावरे व एक पिकअप असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या (Accused) विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Winter : नाशिककरांना हुडहुडी! निफाडचे ६.७, तर नाशिकचे ९.४ अंशांवर

याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात पो.शि.अविनाश सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत, मी विंचुर गावात पेट्रोलिंग करीत असतांना रात्री १.४५ वा.चे सुमारास सपोनि.भास्कर शिदे यांनी मला फोन करुन निफाड ते विंचुर रस्त्याने (Niphad Vinchur Road) एक इसम हा त्याच्याकडील पिकअप गाडीमध्ये गायी व बैल गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने घेऊन जाणार आहेत. तरी तुम्ही त्याबाबत माहीती घेऊन कारवाई करा असे कळवल्याने पो.शि.शशिकांत निकम, पो.शि.सागर आरोटे, गोपनीय शाखेचे अंमलदार पो.शि. सुजय बारगळ यांचेसह पो.उ.नि.मारुती सुरासे, पो.शि.चंदू मांजरे यांना फोन करुन त्यांना विंचुर दुरक्षेत्र येथे बोलावून निफाड विंचुर रस्त्यावर जागोजागी थांबलो. त्यानंतर रात्री २.३० वाजेच्या सुमारास आम्ही हॉटेल आनंद समोर उभे असतांना आम्हाला निफाड ते विंचुर रस्त्यावर एम.एच.१५ जी.आर.५३१६ ही पिकअप दिसली.ती आम्ही थांबण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पुढे उभी करून आमच्या पाठलागानंतरही अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेला.

हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी

दरम्यान, सदर गाडीत गोवंश जातीच्या तीन जर्शी व एक गावठी अशा चार गायी, एक वासरी, दोन गोऱ्हे हे निर्दयपणे त्यांना यातना, इजा होईल अशा पद्धतीने दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवलेले दिसले. तेव्हा आमची खात्री झाली की, सदरच्या वाहनावरील चालक हा वाहनामधील जनावरे ही कत्तल करण्याच्या उद्देशाने विना परवाना वाहतुक करताना मिळुन आला म्हणून अज्ञात चालकाविरुद्द गु.रजि. क्रमांक ३१३/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० ११(१), (अ)(ब), महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा, १९७६ ५ अ(१) अन्वये गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.रामनाथ घुमरे अधिक तपास करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...