Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकभाषा विषयांच्या पेरपरला १० कॉपी प्रकरणे

भाषा विषयांच्या पेरपरला १० कॉपी प्रकरणे

नाशिक । प्रतिनिधी

दहावी बोर्डाच्या परीक्षेला मंगळवारी (दि.३) प्रारंभ झाला. सकाळी ११ ते २ या वेळेत मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगु या प्रथम भाषेचे तर दुपार सत्रात जर्मन आणि फ्रेंच विषयाचे पेपर घेण्यात आले. विभागात जळगावला ५, नंदूरबारला ४, धुळ्यात १ असे एकूण १० कॉपी प्रकरणे समोर आली.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा घेतली जाते.नाशिक जिल्ह्यात २०२, धुळे ६६, जळगाव १३४, नंदूरबारला ४३ विभागात अशा एकूण ४४५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यातून ९७ हजार ९१२, धुळ्यातून ३१ हजार ८३५, जळगावमधून ६४ हजार ५० तर नंदूरबारमधून २२ हजार ५७८ अशा एकूण २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ठ होते.

पहिलाच पेपर असल्याने पाल्यास परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आणि त्याचा परीक्षा क्रमांक शोधण्यासाठी पालक वर्गाने देखील गर्दी केली होती. मंगळवारी प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी त्यातील काही विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षा गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी सर्वच केंद्रांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, तरी देखील कॉपी कॉपी बहाद्दर पकडण्यात आले. नाशिक जिल्ह्यात मात्र, एकही कॉपी केस आढळली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या