Thursday, May 2, 2024
Homeनाशिकएचपीटी महाविद्यालयात ‘देशदूत’चा उपक्रम; पत्रकारिता विभागात शॉर्टफिल्म कार्यशाळा

एचपीटी महाविद्यालयात ‘देशदूत’चा उपक्रम; पत्रकारिता विभागात शॉर्टफिल्म कार्यशाळा

सातपूर । प्रतिनिधी

सामाजिक भान जोपासण्याची प्रत्येकाने सवय लावणे गरजेचे आहे. त्यासोबतच योग्य साधनांचा योग्य पध्दतीने वापर करुन योग्य बदलाची अपेक्षा धरण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. त्यादृष्टीने सभोवतालचा अभ्यास करुन जनप्रबोधनात्मक लघुचित्रपट (शॉर्टफिल्म) बनवण्यासाठी स्पर्धेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन चित्रपट पटकथा लेखक व शॉर्टफिल्म निर्माते निशांत वाघ यांनी केले.

- Advertisement -

‘दैनिक देशदूत’च्या वतीने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राष्ट्रीय शॉर्टफिल्म स्पर्धा आणि फेस्टीवलच्या पार्श्वभुमीवर एचपीटी आर्टस् अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयात ‘शॉर्ट फिल्म मेकींग’ या विषयावर कार्यशाळा आयाजित करण्यात आली होती. यावेळी वाघ बोलत होते. ही कार्यशाळा वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागात पार पडली.

यावेळी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वृंंदा भार्गवे, प्रा. रमेश शेजवळ, ध्वनी विशेषज्ज्ञ उद्योजक प्रशांत साठे, निर्मिती सहाय्यक विश्वजीत यादव, देशदूततर्फे रवींद्र केडीया, दिनेश सोनवणे, गोकुळ पवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. वृंदा भार्गवे यांनी महाविद्यालयाच्या ३७ वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर करत कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.

या कार्यशाळेत निशांत वाघ यांनी शॉर्ट फिल्म निर्मितीतील विविध आव्हानांची माहिती सांगितली. त्यात प्रामुख्याने कथा, संवाद संहिता, सिनेमॅटोग्राफी, एडीटींग, संगीत व श्रेय नामावली यांची सविस्तर माहिती कथन केली. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांचा लघुचित्रपट निर्मितीत सहभाग असतो. महाविद्यालयातील विद्याथ्यार्ंंनी तयार केलेले लघुपट युनिसेफच्या यादीत सहभागी झाले आहेत. यामूळे वाघ यांच्याशी विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधत शंकांंचे निरसन करून घेतले.

यावेळी स्वर विशेषज्ज्ञ प्रशांत साठे यांनी चित्रपटात आवश्यक असणार्‍या आवाजाच्या विविध चढउतारांचे प्रात्याक्षिके दाखवत विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून सांगितले. देशदूतच्या राष्ट्रीय शॉर्टफिल्म स्पर्धेत निवड झालेल्या शॉटफिल्मस्चे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यादरम्यान संपूर्ण दिवसभराचे शॉर्टफिल्म निर्मितीची माहिती तज्ज्ञांंच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

आवाजाचे बारकावे जाणून घ्या
चित्रपटात आवाजाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक सिनेअभिनेते आपल्या आवाज, डायलॉगमुळे प्रसिद्ध आहेत. कुठल्या वेळी कसा आवाज निघाला पाहिजे. याचा प्रत्येकाने सराव करणे गरजेचे आहे. कलाकाराला कला सादर करणे सांगण्याची गरज नसते तो त्याच्या पद्धतीने व्यक्त होत असतो. त्यामुळे छंद जोपासताना बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. – प्रशांत साठे, हौशी स्वरविशेषज्ञ

- Advertisment -

ताज्या बातम्या