नाशिकरोड येथून सदर प्रवासी रेल्वेच्या श्रमिक एक्सप्रेसने ऊत्तरप्रदेशकडे रवाना
इगतपुरी । प्रतिनिधी
तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी बस डेपो आगारातुन सात बसमधुन १७२ परप्रांतीय प्रवाशांना उत्तरप्रदेशला जाण्यासाठी नाशिकरोडला रवाना करण्यात आले असुन आतापर्यंत तीन हजारच्या आसपास हातमजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यात आल्याची माहीती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर व घोटी कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरख बोडके यांनी उत्तरप्रदेकडे जाणाऱ्या प्रवाशांना बिस्किट व पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी बसमधील प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य सरकारचे आभार मानत ‘ जय महाराष्ट्र ‘ अशा घोषणा दिल्याने बस आगाराचा परिसर या घोषणांनी दणानुन गेला होता.
मजुरांनी कोणत्याही परिस्थितीत पायी चालत जाऊ नये. यासाठी त्यांना सर्व सुविधा राज्य सरकारने उपलब्ध केल्या असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी यावेळी दिली. यापुर्वीही मुंबईहुन इतर राज्यात पायी चालत जाणाऱ्या हातमजुरांना मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी येथील घाटनदेवी मंदीराजवळील चेकपोस्टजवळ अन्नाची पाकीटे, पाणी बॉटल, बिस्कीटे, शितपेयाची व्यवस्था आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड, माजी जि. प. सदस्य यांनी केली होती.
लॉकडाउनमुळे राज्या-राज्यात अडकलेले मजूर आपल्या मूळगावी राष्ट्रीय महामार्गावरून अत्यंत विदारक हाल-अपेष्टा सहन करत कामगार ऊन्हातान्हात पायी चालत जात स्वतःचे मुळगाव गाठत असल्याचे चित्र आता बदलले आहे. परराज्यातील हातमजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी मुंबईहुन येणाऱ्या कसारा घाटाच्या सुरवातीला नाशिक जिल्हयाच्या सरहद्दीजवळील चेकपोस्ट जवळ, इगतपुरी डेपो, गोंदे दुमाला, वाडीव-हे आदी ठीकाणी बसची व्यवस्था तहसीलदार व आमदार यांनी केली होती.
बसच्या माध्यमातुन मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या अनेक हातमजुर व प्रवाशांना मध्यप्रदेशच्या सरहद्दीवर सोडण्यात आले. तर ऊतरप्रदेशकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांना नाशिकरोड येथे सोडुन रेल्वेच्या श्रमिक एक्सप्रेसने ऊत्तरप्रदेशकडे रवाना करण्यात आले. ऊत्तरप्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, आगारप्रमुख संदीप पाटील, राष्ट्रवादी महीला आघाडीच्या अध्यक्षा अनिता घारे, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, शहराध्यक्ष वसीम सैयद, कमलाकर नाठे गणपत अवघडे, कुणाल शिंपी, आदी उपस्थित होते.