Monday, May 6, 2024
Homeनाशिकनाशिक औद्योगिक क्षेत्रात साडेतीन हजार उद्योग सुरू, बावीस हजार कामगारांनी घेतले दुचाकी...

नाशिक औद्योगिक क्षेत्रात साडेतीन हजार उद्योग सुरू, बावीस हजार कामगारांनी घेतले दुचाकी पास

सातपूर । प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रयत्नशील असून आतापर्यंत सहा हजार १०० उद्योगांना ऑनलाइन परवानगी देण्यात आली आहे, तर २२००० कामगारांना दुचाकी-चारचाकी चे पास वितरीत करण्यात आले असल्याचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार २३ मार्च पासून उद्योगक्षेत्र बंद झाले होते अनेक कारखान्यांचे उत्पादने अर्धवट स्थितीत अडकून पडली होती मागील ४० दिवसांपासून उद्योग क्षेत्राची चाके थंडच होती या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उद्योग क्षेत्राला गती देण्याचा निर्णय घेतला असल्याने एमआयडीसीने उद्योग सुरू करण्याची परवानगी ऑनलाईन देण्यास सुरुवात केली.

आता पर्यंत नाशिक परिसरात ६१०० उद्योगांनी परवानगीसाठी अर्ज केले होते सेल्फ डिक्लरेशन देत त्यांना थेट परवानग्या ऑनलाईनच मिळालेल्या आहेत ७६४ बसेसना परवानगी देण्यात आली आहे खाजगी वाहनांनी कारखान्यात जाणाऱ्या २२३०१ कामगारांना दुचाकी व चारचाकी चे कामगार पासेस देण्यात आले आहे त्यामुळे उद्योग क्षेत्राच्या कामांना खऱ्या अर्थाने गती मिळाली असल्याचे चित्र आहे.

औद्योगिक क्षेत्रात ६१०० उद्योगांनी परवानगी मिळवली असली तरी प्रत्यक्षात ३५०० उद्योग उत्पादन प्रक्रियेत गेलेले आहेत उर्वरित उद्योगही लवकरच उत्पादन प्रक्रिया करतील असा विश्वासही गवळी यांनी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्राची स्थिती पाहता उत्पादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहेत त्यात प्रामुख्याने स्थलांतरित झालेल्या मजुरांचे प्रश्न गंभीर होऊ लागले उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची दुकाने अद्याप सुरू न झाल्याने दुसऱ्या शहरातून येणाऱ्या कच्चामाल वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत यासोबतच मोठ्या उद्योगांची उत्पादने पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्यामुळे लघु मध्यम उद्योगांना फारशी मागणी उपलब्ध होत नाही आहे हा ही एक त्यातला अडसर आहे. मात्र, अल्पावधीत या कार्याला गती मिळून उद्योगक्षेत्र पूर्ण क्षमतेने कामाला लागेल असा विश्वास उद्योजक व्यक्त करीत आहेत

- Advertisment -

ताज्या बातम्या