Friday, May 3, 2024
Homeनाशिकमुरमाड जमिनीवर फुलविली केशर आंंब्याची बाग

मुरमाड जमिनीवर फुलविली केशर आंंब्याची बाग

सुरगाणा | वाजिद शेख 

योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर जिद्द चिकाटी परिश्रम करण्याची तयारी असल्याच्या मोठ्या उतारारीवर पडीत मुरमाड जमिनीवर ही केसर आंब्याची हिरवीगार बाग फुलविता येते,हे सुरगाणा तालुक्यातील भदर येथील शेतकरी रमेश भिका थोरात व त्याच्या पत्नी भदर गामपंचायतचे संरपच झंपाबाई थोरात व त्याच्या कुटुंबियांनी दाखवुन दिले.सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतक-यासमोर थोरात यांनी एक आदर्श उभा केला आहे.

- Advertisement -

सुरगाणा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर रमेश थोरात यांची शेतजमिण आहे, त्याच्याकडे असलेल्या एकुन मुरमाड जमिनी पैकी मोठा उतार असलेली एक ते दिड एकर जमीन मुरमाड असल्याने वर्षानुवर्षा पासुन पंडीत होती.कोणतेही पिक घेतले जात नव्हते. साधारण दहा वर्षांपासून त्याच्या घरी मोहमाळ येथिल शिक्षक काशिनाथबाबा गागुडे सर याच्या सोबत संपर्क व येणे-जाने झाले.गागुडे व शेतकरी थोरात या दोघांची मुरमाड जमिनीवर केशर आब्याची बाग लावण्यास रमेश थोरात व पत्ती झंपाबाई थोरात.

या दोघांना जमिनीवर केशरआब्याची बाग लावण्यास सल्ला दिला. मुरमाड जमिनीवर काय आब्याची रोपे कशी वाढतील अशी थोरात याना शंका होती. माञ गागुडे सर यानी त्याना उभारी दिली. अखेर थोरात यांनी गुजरात राज्यातून ६०-७० रूपये दराने केसर आब्याची ७५० रोपे खरेदी केली व पडीत मुरमाड जमिनीवर साधारण आठ बाय दहा फुटांच्या अंतरावर लावली. पाण्याची व्यवस्था ठिबक सिचनने करण्यात आली.

संपूर्ण लागवडीपासुन ते आतापर्यंत मार्गदर्शन महात्मा फुले कृषी विद्यापिठ कांदा व दाक्ष संशोधन केंद पिपळगाव बंसवत येथिल कमलाकर जाधव, विजय धुम, रामदास खैरनार, दिलीप गवारे हे थोरात याच्या शेतात जाऊन मार्गदर्शन नेहमी करत राहतात. विशेष म्हणजे घेतलेल्या योग्य सल्यामुळे योग्य मार्ग दर्शन व मेहनती मुळे सर्वच्या सर्व झाडे केसर आंब्याची रोपे डौलाने उभी राहिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या