Sunday, September 8, 2024
Homeनाशिकनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, खा.डॉ.भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, खा.डॉ.भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक । प्रतिनिधी

मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावली आहे.यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी खा.डॉ.भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

- Advertisement -

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा, देवळा, चांदवड, येवला, निफाड या तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा ,पावसासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

येवला तालुक्यात विज पडून जीवित हानी झाली आहे.एकीकडे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने थैमान घातलेले असतांना शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे.त्याच्यावर निसर्गाची ही अवकृपा झाली आहे.शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून संपूर्ण पीक नष्ट झाले आहे.अशा परिस्थितीत बळीराजाला मदत मिळाली पाहिजे.

नुकसान झालेल्या शेतीमालाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याकामी उचित कार्यवाही होऊन संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला योग्य न्याय मिळून द्यावा,अशी विनंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे खा.डॉ.भारती प्रवीण पवार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या