Sunday, May 5, 2024
Homeनाशिकआता नवीन सुविधांसह धावणार ‘गोदावरी एक्स्प्रेस’

आता नवीन सुविधांसह धावणार ‘गोदावरी एक्स्प्रेस’

उद्यापासून नव्या दिमाखात धावणार

मनमाड।  प्रतिनिधी

- Advertisement -

मनमाड ते मुंबई प्रवास करणारे चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची माणली जाणारी गोदावरी एक्प्रेसचा जुना रॅक बदलून अत्याधुनिक सुविधांयुक्त ‘एलएचबी’ हा नवा रॅक लावण्यात येणार असल्याने सोमवार (दि.१६) मार्चपासून ती नव्या लुकमध्ये दिमाखात मनमाड-मुंबई आणि मुंबई ते मनमाडदरम्यान धावणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

वातानुकूलित, १४ द्वितीय श्रेणी चेअर कार, राइडिंग कम्फर्ट, कुशन/आरामदायी आसन व्यवस्था, मोठ्या खिडक्या, सामान ठेवण्यासाठी मुबलक जागा, बायो-टॉयलेट्स, मोबाईल चार्जिंग अशा विविध सर्वसुविधांयुक्त नवा रॅक (दि.१६) मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. मनमाड येथून सकाळी ८:३५  वाजता सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस गाडी पंचवटीप्रमाणेच मुंबईककडे जाण्यास सोयीची आहे. एकप्रकारे या भागातील प्रवाशांसाठी ती ‘लाईफ लाईन’ मानली जाते. त्यामुळे या गाडीतून मनमाड, नांदगाव, येवला, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी येथून शेकडो चाकरमाने व सर्वसामान्य प्रवास करतात; मात्र गेल्या काही वर्षांपासून या गाडीचा रॅक खराब झाला होता.

पावसाळ्यात अनेक डबे अक्षरशः गळत होते. त्यामुळे गोदावरी एक्स्प्रेसने प्रवास करताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांनी याप्रश्नी वारंवार तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत गोदावरी एक्स्प्रेससाठी ‘एलएचबी’ हा नवा रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला, दरम्यान, नवा रॅक तयार झाल्यानंतर त्याची चाचणी घेण्यात आली असून, आता हा नवा रॅक (दि.१६) मार्चपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.

एकूण १७ डबे असलेल्या या नवीन रॅकमध्ये एक डबा वातानुकूलित, १४ द्वितीय श्रेणी चेअर कार तर २ डबे जनरेटरचे असणार आहेत. सर्व आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेला हा नवा रॅक आता मुंबईकडे धावण्यास सज्ज झाला आहे. या सुखद पार्श्वभूमीवर आता गोदावरी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. त्यांचा प्रवास आरामदायी होणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या