Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनिसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

येवला तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळ नुकसान, कोविड-१९, पाणीटंचाई व खरिपाबाबत ना.छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

येवला । प्रतिनिधी

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रात विविध भागात मोठा फटका बसला आहे. याचा फटका नाशिक जिल्ह्याला देखील बसला असून आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. नुकसान ग्रस्तांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळामुळे अंदरसुल आणि धामणगाव परिसरात नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर येवला तहसील कार्यालय येथे निसर्ग चक्रीवादळ नुकसान, खरीप आढावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार,तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे,गटविकास अधिकारी उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील, महावितरणचे उपकार्यकरी अधिकारी एम.पी.प्रजापती, उपविभागीय अभियंता एस.एम.देवरे, उपअभियंता स.प्र. राजपूत,तालुका कृषी अधिकारी के.ए. नवले,येवल्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनास अहवाल देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.तसेच येवला शहर व तालुक्यात असलेल्या कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. त्यात संशयित रुग्ण , सद्यस्थितीत उपचार घेत असलेले अॅक्टीव रुग्ण , बरे होऊन डीसचार्ज मिळालेले रुग्ण , तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण , संस्थात्मक, होम कॉरंटाईन, करोना केअर सेंटर व Dedicated Corona Health Centre (DCHC) च्या व्यवस्थापन बाबत आढावा घेतला.

त्याचबरोबर येवला तालुक्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेऊन त्याची सद्यस्थिती शेतकऱ्यांना देण्यात येणारे पीककर्ज वाटप,बियाणांची उपलब्धता व पुरवठ्याबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा या बाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा आढावा घेऊन येवल्यातील पाणी टंचाईबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा, ३८ गाव व ४१ गाव पाणी पुरवठा योजनांची माहिती घेत वीज पुरवठा व ट्रान्सफॉर्मर बाबत अडचणी जाणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या