Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि.प. प्रशासकीय इमारतीचे आज भूमिपूजन; भुजबळ, थोरात, राऊत प्रथमच एका व्यासपीठावर

जि.प. प्रशासकीय इमारतीचे आज भूमिपूजन; भुजबळ, थोरात, राऊत प्रथमच एका व्यासपीठावर

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार संजय राऊत व माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे गुरुवारी (दि.२६) प्रथमच जाहीर कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येत आहेत. निमित्त आहे जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत भूमिपूजनाचे.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. युती शासनाच्या कार्यकाळात या इमारतीसाठी ५५. कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र, काही महिन्यांपासून तांत्रिक मान्यतेअभावी भूमिपूजन सोहळा रखडला. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचा भूमिपूजन सोहळा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांनी सुरू केले होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते तथा ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. भुजबळ व थोरात यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता हे भूमिपूजन होणार आहे.

समारंभास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, सभापती यतींद्र पगार, मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, अर्पणा खोसकर व मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या