Friday, May 3, 2024
Homeनाशिकपोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर

पोषण आहार, शिल्लक धान्य साठा वाटप करणार – जि.प. अध्यक्ष क्षिरसागर

नाशिक । प्रतिनिधी

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील सुमोटो रिट याचिका २/२०२० अन्वये दिलेल्या निकालानुसार शालेय विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य साठा शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे निर्देश शिक्षण संचालक, पुणे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील हंगामी वसतिगृह व शाळांमध्ये शिल्लक असलेला धान्य साठा वाटप करण्याचे आदेश नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब रामनाथ क्षिरसागर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.शालेय स्तरावर उपलबद्ध असलेला धान्य व कडधान्य साठा शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तथा पोषण आहाराचे काम पाहणारे शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी तथा पालक यांना सम प्रमाणात वाटप करण्याचे सूचित केले आहे.

शाळा स्तरावर सदर धान्य वाटप करण्याची प्रसिद्धी करण्यात येऊन शालेय स्तरावर धान्य घेण्यासाठी एकाच दिवशी विद्यार्थी व पालक यांची गर्दी होणार नाही यादृष्टीने टप्प्या टप्प्याने नियोजन करण्याबाबत सूचित केले आहे. विद्यार्थी व पालक धान्य घेण्यास आल्यास त्यांच्यातील एकमेकांपासूनचे अंतर एक मीटर पेक्षा जास्त राहील याची काळजी घेण्यात येऊन हे सर्व करत असतांना जिल्हाधिकारी तथा शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांची सक्तीने पालन करण्याची खबरदारी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पोषण आहार कामकाज पाहणारे शिक्षक यांनी घ्यावी.

शालेय स्तरावर धान्य व कडधान्य वाटप करण्याबाबत पुर्व कल्पना जिल्हाधिकारी, पोलीस विभाग व तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका पोलीस स्टेशन यांना देण्यात येऊन याबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीस देण्यात आल्याचे शिक्षण संचालकांचे परिपत्रकात नमुद असून याप्रमाणे सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सुचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या