Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्ह्याचा पारा घसरला; गारठा वाढला; शेतकर्‍यांच्या चिंतेत भर

जिल्ह्याचा पारा घसरला; गारठा वाढला; शेतकर्‍यांच्या चिंतेत भर

नाशिक । प्रतिनिधी

जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशासह उत्तरेकडील राज्यात बर्फवृष्टीमुळे याभागातील जनजीवन ठप्प झाले असून यामुळे निर्माण झालेल्या शितलहरीमुळे शेजारील राज्यात थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे.

- Advertisement -

राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीची लाट आली असुन अजुन हेच वातावरण काही दिवस राहणार आहे. आज राज्यात सर्वात कमी किमान तापमान ८.८ अंश सेलिसअस निफाड येथे तर १०.२ अंश सेल्सीअस नाशिक येथे नोंदविले गेले. या घसरलेल्या पार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. यात विदर्भातील पारा ५ ते ६ अंशापर्वत गेला होता. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२अंशावर गेला होता. याचा मोठा फटका अनेक जिल्ह्यांना बसला असुन नागपुर नंतर आता नाशिकला गेल्या आठवड्यातून सलग दोन वेळा राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

अगदी महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान नाशिक जिल्ह्यात नोंदविले जात आहे. अशाप्रकारे राज्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. गेल्या १ जानेवारी रोजी महाबळेश्वरला मागे टाकत राज्यात सर्वात कमी १०.३ अंश किमान तापमानाची नोंद नाशिकला झाली. त्यानंतर आज नाशिकला १०.२ अंश अशा तापमानाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज आद्रता ९३ टक्क्यापर्यत गेली होती. परिणामी पहाटे सर्वत्र धुक्क्याची दाट चादर बघायला मिळाली. याचा परिणाम वाहतुकीवर सकाळ्याच्या व्यवहारावर झाल्याचे दिसुन आले. पार खाली येत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील द्राक्ष, इतर फळबागा व भाजीपाल्यावर घसरलेल्या तापमानाचा परिणाम जाणवू लागला आहे.

राज्यात नाशिक पाठोपाठ मालेगांव १२, महाबळेश्वर १३, जळगांव १३.६, औरंगाबाद १३.९,वासीम १३.४, वर्धात १३.७, अमरावती १५.२, बुलढाणा १२.६, अकोला १५.२, गोदिया १५.६, यवतमाळ १७, सांगली १७.७, कोल्हापूर १७.५, नांदेड १७, परभणी १६.६, रत्नागिरी २१, नागपुर १५, गोदिया १५.६, सातारा १४.९ व सोलापूर १९.६ अशा तापमानाची  नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या