Friday, May 3, 2024
Homeनाशिकसिटूतर्फेे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर‘लेबर कोड’ची होळी

सिटूतर्फेे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर‘लेबर कोड’ची होळी

सातपूर । प्रतिनिधी

केंद्र सरकारने ५५ कामगार कायद्याचे रुपांतर ४ लेबर कोडमध्ये केले असून हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करत कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सिटूतर्फे या लेबरकोडची होळी करण्यात आली. यावेळी निर्णयाचा निषेध नोंंदवित कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांना निवदन देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनानुसार मध्यवर्ती कामगार संघटनांनी अनेक वेळा मोर्चे व अखिल भारती संपाद्वारे कामगारांचे प्रश्न मांडत कामगार कायद्याच्या बदलाबाबत निवेदने दिली आहेत. कामगार कायद्यात बदल करण्यापुर्वी केंद्र सरकारने कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेवून कामगार कायद्यात बदल करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता एकतर्फी निर्णय घेवून कामगारांवर अन्याय केला असल्याचे सिटूचे जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे यांनी केला आहे.

दरम्यान, दिवसभर सिटूची युनियन असलेल्या प्रत्येक कारखान्यासमोर तसेच सायंकाळी ५ वाजता सिटू तर्फे कामगार उपायुक्त कार्यालया समोर निदर्शने करत या बिल कोडची होळी करत सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त गुलाब दाभाडे यांना देण्यात आले. यावेळी सिटू जिल्ह्याध्यक्ष सीताराम ठोंबरे, मुकुंद रानडे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, हर्षल नाईक सह कामगार उपस्थित होते.

मागण्या
१) ४४ केंद्रीय कामगार कायद्याचे ४ लेबर कोडमध्ये रूपांतर केलेला एकतर्फी बदल त्वरित मागे घ्यावा
२) कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक घेवूनच.कामगार कायद्यात बदल करावा
३) ज्यांना कामगार कायदे लागू नाहीत त्यांना कामगार कायदे त्वरित लागू करावे
४) केंद्रीय, राज्य, केंद्रशासीत, जिल्हा पातळीवर त्रिपक्षीय समित्या स्थापन करुन त्यात ट्रेड युनियनला समान प्रतिनिधीत्व दयावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या