त्र्यंबकेश्वर | वार्ताहर |
उत्तर भारतीयांचा (North Indians) श्रावण (Shravan) सुरू झाल्यामुळे आज पहिला सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwar) मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गर्दीमुळे (Crowd) शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले.
त्र्यंबकराज मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी जाण्याकरिता भाविकांच्या रांगा मंदिराच्या पूर्व दरवाजातून जाऊन जुने महादेव मंदिर पुलावरून रिंगरोडच्या एका बाजूने स्मशानभूमी रोड पुलावरून नारायण नागबली धर्मशाळा लगत असलेल्या मंदिर ट्रस्टच्या खुल्या मंडपातून पुढे मंदिर ट्रस्टच्या मुख्य वातानुकूलित मंडपात जाणे आणि नंतर नंदी मंदिरात जाऊन शेवटी मुख्य मंदिरात जाणे असा होता. याठिकाणी आल्यानंतर उघडा मंडप होता. तसेच कोणत्याही सुविधा नव्हत्या. याशिवाय प्रचंड अस्वच्छता देखील होती.
तर ऑनलाइन तिकीट (Online Ticket) दर्शन पेड दर्शन मार्ग त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे (Civil Hospital) जाणे असा होता. याठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या दोन रांगा होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणाऱ्या दर्शन रांगेत भाविक कुठल्याही रांगेत घुसत होते. त्यामुळे आपली रांग कोणती हे देखील भाविकांना समजत नव्हते. मंदिराजवळ आल्यावर कोणती रांग आहे ते कळत होते. यामुळे गोंधळाची स्थिती दिसून येत होती.
दरम्यान, गेल्या तीन दिवस मिळून लाखांच्यावर भाविकांनी दर्शन घेतले आहे. त्र्यंबकेश्वरला सातत्याने पावसाच्या (Rain) सरी कोसळत आहे. मात्र या पावसाची परवा न करता भाविक (Devotees) दर्शनासाठी रांगेत उभी आहेत. ही गर्दी येत्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




