Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : दिंडोरीत २५ किमी परिसरात जोरदार आवाज; घरांच्या काचा फुटल्या,...

Nashik News : दिंडोरीत २५ किमी परिसरात जोरदार आवाज; घरांच्या काचा फुटल्या, लोक घाबरले

नेमकं काय घडलं?

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरीसह आसपासच्या २५ किमी परिसरात दुपारच्या सुमारास अचानक जोरदार आवाजाने (Loud Noise) आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आवाज इतका भयंकर होता की, यामुळे काही घरांच्या काचा देखील फुटल्या. परंतु, हा आवाज नेमका कशाचा होता याची सुरुवातील कुठलीही माहिती मिळालेली नव्हती. यानंतर तलाठी, तहसीलदार आणि पोलिसांनी तपास केल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा आवाज नाशिकच्या (Nashik) ओझर (Ozer) येथील लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा होता. हिंदुस्थान अरोनॉटिक्स लिमिटेडकडून ही विमाने तयार केली जातात. त्यात सुखोई या लढाऊ विमानाच्या सरावाचा हा आवाज होता. सरावावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळून अवकाशात उडत गेले. ज्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाल्याने दिंडोरी भागातील (Dindori Area) काही घरांच्या काचा फुटल्या तर काहींना हादरा बसल्याचे, त्यांनी सांगितले.

तसेच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) म्हणाले की, “संबंधित प्रकाराबाबत एचएलएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी माहिती घेतली. त्यात सुखोई विमानाचा (Sukhoi Aircraft) सॉनिक बूम झाल्याने आवाज येतो. ध्वनीच्या वेगापेक्षा हा अधिक वेगाने सुखोई विमान हवेत उडते. त्यावेळी हा आवाज येतो. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याची शक्यता आहे. दिंडोरीत हेच घडले असावे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या भागात कुठलीही दुर्घटना घडली नाही. विमान जमिनीच्या (Land) जवळून गेल्याने मोठा आवाज झाला. याप्रकरणी अधिक तपास करत असून, कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

राष्ट्रीय

राष्ट्रीय विक्रम मोडला, ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला; सावन बरवालचा ऐतिहासिक रौप्यपदकावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiआशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या पदकासह आशियाई क्रीडा...