नाशिक | प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे…
- Advertisement -
मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्या साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
१० मार्च रोजी नाशिक येथे होणार्या विशेष सोहळयात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षाआड दिल्या जाणार्या जनस्थान पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.