त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar
आज येथील संत निवृत्तिनाथ महाराजांची (Sant Nivrittinath Maharaj) यात्रा असल्याने पहाटेच्या सुमारास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा (Mahapuja) पार पडते. यंदाच्या वर्षी नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती असल्याने महापूजेचा मान कुणाला मिळणार? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, अखेर ही महापूजा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकरही सपत्नीक उपस्थित होते. यावेळी त्र्यंबकेश्वरला वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना महाजन म्हणाले की, “मला याठिकाणी येण्याचा दुसऱ्यांदा योग आला आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत (Amit Shah) आलो. त्यानंतर आज पुन्हा पूजेसाठी आलो असून मी चौथ्यांदा संत निवृत्तिनाथ महाराजांची पूजा करत आहे. कुंभमेळा मंत्री (Kumbh Mela Minister) म्हणून माझे नाव घोषित झाले असूनसुरक्षित कुंभमेळा करणार आहोत. त्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे” असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “संत निवृत्तिनाथ महाराजांच्या मंदिराच्या कामकाजासाठी काही निधी येणे बाकी आहे. तात्काळ पाठपुरावा करून निधी आणला जाईल, निधी कमी पडू देणार नाही. असे त्यांनी म्हटले. तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबाबत विस्तृत बैठक झाली असून या बैठकीस सर्व खात्याचे सचिव आणि अधिकारी होते उपस्थित होते. तयारीसाठी वेळ कमी असून लवकर कामे मार्गी लावावी लागणार आहेत. प्रयागराजला व्यवस्था पाहण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन जाणार असून तिथल्या चांगल्या वेंडरशी बोलणार आहोत” असेही गिरीश महाजन यांनी म्हटले.