Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना हजार किलो सिमला मिरचीचे वाटप

अडचणीत सापडलेल्या गोरगरिबांना हजार किलो सिमला मिरचीचे वाटप

मालेगाव | प्रतिनिधी

लॉक डाऊन संचार बंदीची सर्वाधिक झल गोरगरीब मजूर व सामान्य जनतेस बसत आहे अडचणीतअसलेल्या या नागरिकांना आपल्या पॉलिहाऊस मधील उत्पादित सुमारे 1 हजार किलो पेक्षा अधिक सिमला मिरचीचे वाटप तुळजाभवानी मित्रमंडळाचे संस्थापक व सोयगावचे माजी सरपंच जयराज बच्छाव यांनी करत दिलासा दिला.

- Advertisement -

शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसे जमिनीत वाढत आहे त्यामुळे लॉंग डाऊन ची अंमलबजावणी अधिक शक्ती ने केली जात आहे मात्र याचा त्रास आता गोरगरीब जनतेस होऊ लागला आहे.

त्यामुळे पंधरा ते वीस रुपये किलो असा बाजार भाव असला तरी त्याकडे दुर्लक्ष करत बच्छाव यांनी पॉली हाउस मध्ये तयार सिमला मिरची काढून ती अयोध्यानगर स्वप्नपूर्ती नगर बोरसे नगर पोफळी नगर गिरणा स्टील आदी भागातील गोरगरीब मजूर तसेच सामान्य नागरिकांना वाटून दिली.

सुमारे 1000 किलो पेक्षा अधिक सिमला मिरचीचे वाटप बच्छाव यांनी केले. संकटाच्या काळात गोरगरिबांना मदत करणे हेच राष्ट्रकार्य मानणाऱ्या तुळजाभवानी मित्र मंडळाची परंपरा राहिली आहे. बच्छाव यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या