Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्याGirish Mahajan : मंत्री महाजनांनी साधू गांजा पिण्यासाठी येतात म्हणणाऱ्यांना सुनावलं; वृक्षतोडीच्या...

Girish Mahajan : मंत्री महाजनांनी साधू गांजा पिण्यासाठी येतात म्हणणाऱ्यांना सुनावलं; वृक्षतोडीच्या वादावरही बोलले, नेमकं काय म्हणाले?

नाशिक | Nashik

तपोवन (Tapovan) येथील शेकडो झाडे (Tree) वाचविण्यासाठी शहरात मागील चार आठवड्यांपासून नागरिकांसह पर्यावरण प्रेमी व विविध पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील श्रीराम पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून, १५ जानेवारीपर्यंत या वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. या सर्व वृक्षतोडीला विरोध होत असताना सिंहस्थ मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.१५ डिसेंबर) रोजी पंचवटी परिसरातील मखमलाबाद रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले.

- Advertisement -

नाशिकच्या हरित क्षेत्रात नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ‘आपलं नाशिक, हरित नाशिक’ या मोहिमे अंतर्गत वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पर्यावरण प्रेमी, त्र्यंबकेश्वरच्या दहा आणि नाशिकच्या (Nashik) तीन आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी १५ हजार झाडे लावली जाणार असून, पहिल्या टप्प्यात १ हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. या वृक्षारोपणानंतर मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

YouTube video player

यावेळी ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये वृक्षांचा विषय चर्चेचा बनला होता. पंरतु, आज आपल्यासाठी महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असून, आता वृक्षारोप अ‍ॅप तयार केला आहे.मागील कुंभमेळ्यात जेवढ्या राहुट्या होत्या, तेवढ्याच यावेळी लावल्या जाणार आहेत.मागील काही दिवसात तिथे झाडे, झुडुपे वाढलेली आहेत, ती तोडण्याचा विषय होता. जी झाडे काढली जातील त्याचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येईल. गेल्यावेळची ८० टक्के झाडे जगली आहेत”, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.

साधू गांजा पिण्यासाठी येतात हे बोलणे चुकीचे

महाजन पुढे म्हणाले की, “काहीजण साधू गांजा पिण्यासाठी येतात असं बोलून गेले, पंरतु हे बोलणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निसर्गावर प्रेम आहे. एक झाड आईच्या नावावर लावा, असे आवाहन त्यांनी केले होते. अजूनही कुठे जागा असेल तर तिथं ही झाडे लावू. १३०० किलोमीटरवरून आम्ही सध्या दोन हजार झाडे आणली आहेत. याठिकाणी १५ हजार झाडे लावणार असून, त्यापैकी एकही झाड मरू देणार नाही”, असेही त्यांनी सांगितले.

माझे कार्टून बनवलं, लाकूडतोड्या म्हटलं

पुढे बोलतांना मंत्री महाजन म्हणाले की, “मागील काही दिवसांत नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमी, काही राजकीय संघटना उतरल्या. काहींनी माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले गेले, मला करवत घेऊन दाखवण्यात आले. पंरतु, मला त्याबाबत काहीही बोलायचे नाही. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असाही आरोप करण्यात आला. मात्र, हे पाप कोण करणार?” असेही त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...