Saturday, January 31, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar Death : अजितदादांची शेवटची सही माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या…; आमदार सरोज...

Ajit Pawar Death : अजितदादांची शेवटची सही माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या…; आमदार सरोज अहिरेंना शोकसभेत अश्रू अनावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार (दि.२८) रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजितदादांच्या निधनानंतर अनेक आमदारांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या देखील भावूक झाल्या होत्या. अशातच देवळाली विधानसभा मतदारसंघात शोकसभेचे आयोजन करण्यात आले असता त्यांनी दादांची शेवटची सही माझ्या मतदारसंघातील स्मशानभूमीच्या कामासाठी होती, असे म्हणत पुन्हा एकदा आमदार अहिरेंना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपाल देवव्रत, मुख्यमंत्री फडणवीस, DCM शिंदेंची उपस्थिती

YouTube video player

यावेळी त्या म्हणाल्या की, “दादा गेले हे मन मानायला तयार नाही. ते आवाज देतील असे वाटते. आपल्याला मुंबईत बोलावतील, असे वाटते. माझ्यासारख्या सामान्य मुलीला त्यांनी आमदार केले. माझे वडील गेले त्यावेळी मी लहान होते. बाप वारले हे कळतही नव्हते. पण आता माझा दादा गेला. माझे आयुष्य घेतले असते तरीही चालले असते. पण, माझा दादा, शेतकर्‍यांचा नेता पाहिजे होता. त्यांनी घाणेरडे राजकारण कधीही केले नाही”, अशा भावना त्यांनी यावेळी आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी व्यक्त केल्या.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : सामाजिक कार्य, अजितदादांना राजकारणात खंबीर साथ ते पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; अशी आहे सुनेत्रा पवारांची राजकीय वाटचाल

पुढे त्या म्हणाल्या “अजितदादांनी माझ्या मतदारसंघातील सय्यद पिंपरीच्या स्मशानभूमीच्या कामासाठी एक कोटी रुपये मंजूर करत त्या फाईलवर शेवटची सही केली आणि दादा गेले. हे कसे विसरु? अश्रु कसे थांबतील? आम्ही सर्व आमदार पवार कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहू. माझा खूप मोठा आधार हरपला आहे. काम करत आलोय, काम करत राहू, ही दादांची शिकवण आहे. त्यानुसार काम करणार आहोत. दादा पुन्हा येतील, आमचे वाईट स्वप्न निघून जाईल असे वाटते. देवा जिथे कुठे असशील तर दादाला पुन्हा आण. माझे रक्ताचे नाते नव्हते. पण, त्यांनी मला खूप प्रेम दिले. शेवटची सही माझ्या मतदारसंघाच्या कामासाठी केली. मी आयुष्यभर कधीही राष्ट्रवादी (NCP) सोडणार नाही”, असेही आमदार अहिरे यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Sunetra Pawar : मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवारांची एकमताने निवड

ताज्या बातम्या

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपाल...

0
मुंबई | Mumbai राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याच्या...