नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि नागरिकांचा मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने आज (दि.1) ‘सत्याचा मोर्चा वोट नाही खोट’ हा सर्वपक्षीय आंदोलनात्मक मोर्चा मुंबईत काढण्यात आला होता. त्यासाठी नाशिकमधून (Nashik) शेकडो कायकर्ते रवाना झाले
महाराष्ट्रातील (Maharashtra) तब्बल ९६ लाख बोगस मतदार यादीतील घोळ आणि मत चोरीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या माध्यमातून “ही सत्तेची नव्हे, तर सत्याची लढाई आहे” असा नारा देत नाशिक शहर व जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी व सैनिक राजगड मध्यवर्ती कार्यालयातून मुंबईकडे (Mumbai) रवाना झाले.
दरम्यान, यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, योगेश दाभाडे, तुषार जगताप, सचिन रोजेकर, लक्ष्मण साळवे, विशाल भावले, ज्ञानेश्वर बगडे, अविनाश पाटील, सोमनाथ पाटील, किशोर वडजे, दीपक मोकळ आदी उपस्थित होते.




