Friday, September 20, 2024
HomeनाशिकNashik News : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार; जुलूस मिरवणूक १६...

Nashik News : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार; जुलूस मिरवणूक १६ सप्टेंबरला दोन तास अगोदर काढणार

नमाजची वेळ देखील बदलली

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

- Advertisement -

१७ सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Immersion Procession) आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार व चंद्रदर्शन झाल्याप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीचा मोठा सण येत आहे. त्यामुळे पैगंबर जयंतीची (Prophet Birth Anniversary) मिरवणूक कधी काढायची याबाबत मागील काही दिवसांपासून शहरातील उलेमा मंडळी तसेच पोलीस प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

या पार्श्वभूमीवर आज खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) जबाबदार नागरिकांची बैठक होऊन १६ तारखेला जुलूस अर्थात ईद-ए- मिलादुन्नबी साजरी होणार आहे. यासाठी वेळेत बदल करण्यात आला आहे. शहरातील सर्व मशिदींमध्ये दीड वाजता होणारी जोहरची नमाज त्यादिवशी एक वाजता पठण होणार आहे. तसेच दोन वाजता चौक मंडई येथील जहांगीर चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर रात्री दहा वाजेपूर्वी जुलूसची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासित करण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik News : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

दरम्यान, हा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एक प्रकारे हा हिंदू मुस्लिम एकतेचा (Hindu Muslim Unity) अनोखा नमुना देखील दिसून येत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जुलूस लवकर काढून लवकर समाप्त करण्यात येणार आहे व सर्व प्रकारचे मार्ग खुले करून देण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या