Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : मनपा, पोलीस विभाग ॲक्शन मोडवर; द्वारका भागात जोरदार अतिक्रमण...

Nashik News : मनपा, पोलीस विभाग ॲक्शन मोडवर; द्वारका भागात जोरदार अतिक्रमण मोहीम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

द्वारका चौक (Dwarka Chowk) अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी दिले होते. त्याचा परिणाम त्वरीत दिसून आला असून, आज रविवारी महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन द्वारका परिसर (Dwarka Area) अतिक्रमण मुक्त केले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे.

- Advertisement -

गुरूवारी मनपात बैठक घेऊन मध्य नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी देखील दोन दिवसात द्वारका व परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे अल्टीमेटम दिले होते. दोन्ही नेत्यांनी प्रशासनाला तंबी दिल्यानंतर आज सकाळी मोठी कारवाई करुन महापालिका तसेच पोलीस विभागाच्या (Police Department) वतीने संपूर्ण परिसरातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमण (Encroachment) जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे द्वारका चौक बऱ्याच वर्षांनी मोकळा दिसून आला. तसेच वाहतूक कोंडी देखील झाली नाही.

YouTube video player

दरम्यान, ही कारवाई लहान दुकानांवरच (Shop) करण्यात आली असून, मोठ्या बांधकाम तसेच अतिक्रमणांना का टाळण्यात आले, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव आदी उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस (Police) बंदोबस्त तैनात होता.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...