Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्या'करोना'च्या कामांना प्राधान्य - नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव

‘करोना’च्या कामांना प्राधान्य – नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकवर करोनाचे मोठे संकट असुन यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करुन पुढे काम केले जाणार आहे. तसेच आरोग्य, शहराची स्वच्छता आणि वैयक्तीक स्वच्छता यावर विशेष लक्ष दिले जाणार असुन करोना साथीच्या माध्यंमातून नाशिककरांना कोणत्याही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. एकुणच सध्याची स्थिती पाहता…

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, अशा भावना नवनियुक्त महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज व्यक्ती केल्या.

नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बुुधवारी (दि.27) रोजी बदली होऊन त्यांच्या जागी एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज दुपारी कैलास जाधव यांनी महापालिकेत येऊन आयुक्त कार्यालयात राधाकृष्ण गमे यांच्या पदभार स्विकारला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. जाधव म्हणाले, जेष्ठ सहकारी अधिकारी गमे यांनी नाशिक शहराच्या विकासासंदर्भात केलेल्या कामाची माहिती दिली, सर्वाच्या सहकार्याने त्यांनी गेल्या वीस महिन्यात मोठे प्रकल्प पुर्ण करुन नाशिक शहराच्या विकासात मोठी भर घातली आहे.

अपुर्ण राहिलेले प्रकल्प पुढच्या काळात पुर्ण केले जाणार आहे. तसेच सध्याचे करोनाच्या पार्श्वभूमीवर गमे यांनी मोठे काम केले असुन याच कामावर फोकस करुन नाशिक मधील रुग्णांचे हाल अपेष्टा होणार नाही, यावर लक्ष दिले जाईल.

बिटको रुग्णालय,आयसोलेशन सेंटर व इतर अपुर्ण काम पुर्ण केले जातील. महापालिकेचे सुरु असलेले प्रकल्प, स्मार्ट सिटी प्रकल्प व इतर कामांसदर्भात माहिती घेऊन पुढच्या कामांची ध्येय धोरणे नंतर स्पष्ट केली जातील, असेही आयुक्त जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या