Friday, May 3, 2024
Homeनाशिकमहापालिकेची 1 हजार कोटींची विकास कामे लॉकडाऊन

महापालिकेची 1 हजार कोटींची विकास कामे लॉकडाऊन

नाशिक । प्रतिनिधी

जागतिक संकट बनलेल्या करोना विषाणूचा प्रादर्भाव रोकण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने देशभरात अर्थिक फटका बसत आहे. याच कारणामुळे नाशिक शहराच्या विकासाला फटका बसला असुन महापालिकेची विकास कामे आणि स्मार्ट सिटी कंपनीकडुन सुरू असलेली विकास कामे ठप्प झाली आहे. मनपा व स्मार्ट सिटी यांची 1 हजार 3 कोटींची विकास कामे थांबली आहे. यामुळे आता ठेकेदारांना मुदतवाढीबरोबरच वाढणारी किंमती द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनी यांच्याकडुन वेगवेगळ्या स्तरावर विकास कामे सुरू असुन काही काही कामांचे कार्यादेश दिले गेल्यानंतर सुरू झालेली कामे करोनाच्या पार्श्वभूमीवर लागु झालेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाली आहे. याठिकाणी काम करणारे अधिकारी व कामगार आपल्या गावी निघुन गेले असुन लॉकडाऊनचा फटका नाशिक शहराच्या विकासाला बसला आहे.

महापालिकेच्या मागील अर्थिक वर्गातील काही कामे आणि आता नवीन अर्थिक वर्षातील अशी सुमारे 525 कोटींची विकास कामे लॉकडाऊनमुळे थांबली आहे. यात बांधकाम विभागातील विविध प्रकाराचे रस्ते विकास 300 कोटी आणि इमारती बांधकामाची कामे 50 कोटी रुपयांची कामे अशी साडेतीनशे कोटींची कामे सध्या थांबली आहे.

तसेच शहरात भूमिगत गटार विभागाकडुन मलवाहिका टाकण्याचे सुरू असलेले 50 कोटींची कामे, पिंपळगांव खांब येथील एसटीपीचे सुरू असलेले 55 कोटींचे काम, पाणी पुरवठा विभागाकडुन सुरू असलेले पाईपलाईन टाकण्याचे 50 कोटींची कामे आणि उद्यान विभागाकडुन उद्यान विकासाची 10 कोटींची कामे अशी विकास कामे थांबली गेली आहे.

तसेच नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडुन सुरू असलेली पाऊणे पाचशे कोटींची विकास कामे लॉकडाऊनमुळे थांबली आहे. यात एबीडी एरिया अंतर्गत रस्ते विकासाची 200 कोटींची काम केली जाणार आहे. तसेच गोदावरी सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत होत असलेली 70 कोटींची कामे आता थांबली आहे.

तसेच गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर पुलाखाली बसविण्यात येणारे मॅकेनिकल गेट बसविणे आणि नदीतील गाळ काढणे असे 11 कोटींचे काम देखील थांबले आहे. त्याचबरोबर पंडीत पलुस्कर सभागृहाचे नुतनीकरणाचे 3 कोटी काम थाबले आहे. त्याचबरोबर शहरात महाआयटी अंतर्गत बसविण्यात येणारे सीसीटीव्ंंही बसविणे आणि केबल टाकणे असे 168 कोटींचे सुरू असलेले काम देखील थांबले आहे. अशाप्रकारे शहर विकासाची कामे लॉकडाऊनमुळे थांबल्याने याचा फटका नाशिककरांना बसला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या