Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : पोलीस आयुक्तांचे अधिकाऱ्यांना 'फ्री हॅन्ड'; भाजप, शिंदे गटाचे पदाधिकारी...

Nashik News : पोलीस आयुक्तांचे अधिकाऱ्यांना ‘फ्री हॅन्ड’; भाजप, शिंदे गटाचे पदाधिकारी रडारवर

प्रभारींच्या कारवायांत वाढ;

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुन्हेगारीचा (Crime) वाढता आलेख कमी करण्याठी शहर पोलिसांनी (City Police) आवश्यक पावले उचलली असून आयुक्त संदीप कर्णिक (CP Sandeep Karnik) आता थेट रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या बारा दिवसांपासून ‘कोम्बिंग’ सुरू असून, सराईत गुन्हेगार, टवाळखोर, मद्यपींसह राजकीय पार्श्वभूमीच्या गुन्हेगारांवरही पोलीसांकडून (Police) गुन्हे नोंदविले जात आहेत.

- Advertisement -

त्यातच, शहरातील कोणत्याही पार्श्वभूमीच्या गुन्हेगाराला किंवा संशयित राजकारण्याला (Political) घाबरु नका. संशयित आहेत, तर अटक झालीच पाहिजे. पोलीस ठाण्यांसह (Police Station) गुन्हे शोध पथकांनी धडक कारवाई करा. कोणाचाही दबाव असेल, तर आयुक्तालयात स्पष्ट कळवा. इकडून योग्य कार्यवाही होईल, दबाव थेट झुगारून लावा’, असे स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

YouTube video player

काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपेक्षेप्रमाणे ‘कोम्बिंग’ किंवा नाकाबंदी न झाल्याचे आयुक्तालयाच्या पथकाला आढळले. त्यान्वये ‘प्रभारी’ निरीक्षकांना विचारणा करण्यात आली आहे. एखाद्या हद्दीत अडचणी उद्भवत असल्यास तेथे गुन्हे शाखेची किंवा आयुक्तालयाच्या पथकांनी धडक कारवाई (Action) करण्याच्याही सूचना आहेत. वरिष्ठ निरीक्षकांनाही जाब विचारला जात असल्याने सर्व प्रकाराच्या गुन्हेगारांची धरपकड होत असून, पोलिसांनी आता दबाव झुगारून कारवायांना सुरूवात केल्याचे दिसते.

शहरात सुरू असलेल्या ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ मध्ये कोणत्याही स्वरुपाच्या दबावाला बळी पडू नका. एखादा नेता, पदाधिकारी, व्यक्ति दबाव निर्माण करीत असेल, तर थेट आयुक्तालयात त्यासंदर्भात माहिती द्या. मुख्यत्वे, गुन्हे नोंद असणारे, रेकॉर्डवरील, संशयित यांना अटक (Arrested) करायची असल्याने त्यात दबाब असण्याची विषय नाही, असे म्हणून कर्णिक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आता कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली आहे.

नेत्यांना इशारा, नंतर गुन्हे नोंद

पंचवटीसह (Panchvati) सिडकोतील दोघा भाजप नेत्यांची आयुक्तांनी कानउघाडणी करुन चांगलेच सुनावले आहे. त्यातच एका भाजप पदाधिकाऱ्याच्या पुतण्यासह नात्यातील काहींवर रामवाडी ते गंगापूर रोडवरील गोळीबाराच्या गुन्ह्यात सहसंशयित करण्यात आले आहे. त्यानुसार आता भाजप, शिवसेना शिंदे गटासह इतर राजकीय पक्षांत ‘कार्यकर्ते’ म्हणून मिरवून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत नेत्यांच्या छत्रछायेखाली राहणाऱ्यांनाही जोरदार धक्का बसला आहे. आगामी काळात राजकीय संशयितांवर गुन्हे दाखल करुन अटक केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...