नाशिक |प्रतिनिधी | Nashik
कांद्याच्या प्रश्नावर (Onion Issue) जिल्हा व शहर काँग्रेसच्या (Congress) वतीने माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता येथील नाफेडच्या (Nafed) कांदा बटाटा भवन, मुंबई-आग्रा रोड कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (Rajaram Pangavhane) यांनी दिली.
महाराष्ट्रात व प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यात (Nashik District) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून आज मातीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला कांदा विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात आहे. यात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारविरोधात सुद्धा हा मोर्चा आहे. कांद्याला किमान उत्पादन खर्चाच्या आधारावर तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला पाहिजे, ही मागणी घेऊन या मोर्चाचे नेतृत्व मा. बाळासाहेब थोरात हे करणार आहेत. जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतक-यांनी (Farmer) उपस्थित राहावे, असे आवाहन राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांनी केले आहे.
जिल्ह्यात व महाराष्ट्रात (Maharashtra) खुला लिलाव पद्धतीने कांद्याची खरेदी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे. सध्या नाफेड शिवार खरेदी करत आहे. यात प्रामुख्याने शेतक-यांऐवजी व्यापारी लोकांचाच कांदा खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय होत आहे. सध्या नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. नाफेडने शेतकऱ्याऐवजी व्यापा-यांकडून व व्यापा-यांनी जो कांदा साठवलेला आहे, त्या कांद्याची नाफेड परस्पर खरेदी करत आहे. या भ्रष्टाचाराविरोधात कॉंग्रेसने रणशिंग पुकारले असून आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.
दरम्यान, या मोर्चामध्ये (Morcha) खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव रमेशभाऊ काहंडोळे, प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रदेश सचिव राहुल दिवे, सुमित्रा बहिरम तसेच कॉंग्रेसचे सर्व तालुका अध्यक्ष, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, सर्व फ्रन्टल प्रमुख, सेवादल, एनएसयूआय यासह कांदा उत्पादक शेतकरी व जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पानगव्हाणे पाटील यांनी केले आहे.





