नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरातील (Nashik City) स्त्यांवरील खड्ड्यांमुळे (Pits) नागरिक त्रस्त झाले आहे. मनपाकडून सतत खड्डे बुजविण्यात येत असले तरी पुन्हा खड्डे होत असल्याने मनपाकडून आता शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण (Asphalting) करण्यात येणार आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नवीन नाशिक परिसरातील (Nashik Area) रस्त्यांवर चालणे देखील मुश्कील झाले आहे. वेळोवळी नागरिकांनी आंदोलने करूनही मनपा प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही आणि ठेकेदाराकडूनही कामे केली जात नसल्याने मनपाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात होता.गेल्या पाच वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खर्च करण्यात आला आहे. सुमारे बाराशे ते पंधराशे कोटी रूपयांचा खर्च होऊनही पावसाळ्यात सत्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे होतात.
यावर्षी देखील खड्यांबरोबरच रस्त्यांवर नव्याने मारण्यात आलेल्या डांबराचा थर व रस्त्यावरील खडीचा थर वाहून गेल्याचे प्रकार घडले. महापालिकेने रस्ते तयार करतांना तीन वर्षांसाठी दायित्व दिले आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षात खड्डे पडल्यास दुरुस्तीदेखील संबंधित ठेकेदाराने (Contractor) करावयाची आहे. मात्र यापूर्वी ठेकेदारांकडून वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याने महापालिकेने तब्बल १८ ठेकेदारांना नोटिसा पाठविल्या होत्या. रस्त्यांची डागडुजी न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिला आहे.