Saturday, October 3, 2026
HomeनगरShirdi : नीता अंबानींनी घेतले साईदर्शन

Shirdi : नीता अंबानींनी घेतले साईदर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जागतिक ख्यातीचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दरबारी शनिवारी रात्री रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता मुकेश अंबानी (Nita Ambani) यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

- Advertisement -

श्रीमती नीता अंबानी यांचे शनिवारी रात्री शिर्डीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी थेट श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन (Sai Baba Darshan) घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी माथा टेकवून प्रार्थना केली. रात्रीच्या शांत आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या दर्शनावेळी श्रीमती अंबानी यांनी काही वेळ मंदिरात थांबून साईबाबांचे आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्रीमती नीता अंबानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सन्मानित केले. साईबाबांची ओढ आम्हाला नेहमीच शिर्डीला (Shirdi) घेऊन येते, येथे येऊन मनाला मोठी शांती मिळते, अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी रिलायन्स समूहाचे काही अधिकारी आणि साईबाबा संस्थानचे वरिष्ठ कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती अंबानी यांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

Ganesh Gite : शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणार; नाशिक बाजार...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Nashik Agricultural Produce Market Committee) प्रलंबित प्रश्न मार्गी लावून शेतकरी, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यास...