Friday, October 23, 2026
HomeनाशिकRupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात...

Rupali Chakankar : नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नाशिक | Nashik

भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची गेल्या दोन तासांपासून नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. आज (रविवारी) सकाळीच चाकणकर एसआयटीच्या चौकशीसाठी पुण्याहून नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट एसआयटीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्याठिकाणी एसआयटीप्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

या चौकशीत रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही (Lawyer) उपस्थित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या चौकशीत अशोक खरात प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी (Police) यापूर्वीच अनेक जणांची चौकशी केली आहे. खरातला सध्या २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातशी बिल्डरांचे लागेबांधे; काळा पैसा पांढरा करण्याचा डाव

चौकशीआधी रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, एसआयटी जो तपास करत आहे, त्या संदर्भात पोलिसांना काही उत्तरे हवी आहेत. तपासाला माझे पूर्ण सहकार्य राहील. जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यावर सर्वांना मिळतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच अशोक खरात याच्याशी संबधित आरोपावर उत्तर देतांना म्हटले होते की, “मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील” असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट

यावेळी बोलतांना रुपाली चाकणकर यांनी समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या की, “ती सर्व खाती बनावट (Fake) आहेत आणि त्याचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येईल,” असे चाकणकर यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : शिर्डीतील जमीन व्यवहार मान्य; खरातची पोलिसांत कबुली, पुन्हा एसआयटीच्या ताब्यात

ताज्या बातम्या

एकरुखे येथे शेतकऱ्याची आत्महत्या; परिसरात खळबळ

0
एकरुखे । वार्ताहर राहता तालुक्यातील एकरुखे येथे एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रशांत बाळासाहेब गवते असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, गुरुवारी रात्री...