Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Assembly Election 2024 : अन् समीर भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Nashik Assembly Election 2024 : अन् समीर भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

येवला | प्रतिनिधी | Yeola

नांदगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) हे पहाटे येवला (Yeola) येथे मतदान (Voting) करण्यासाठी जात होते. मात्र रस्त्यामध्ये अपघातग्रस्त बस दिसताच त्यांनी तातडीने वाहन थांबवले आणि ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.

- Advertisement -

मनमाड (Manmad) आगाराची मनमाड-शिर्डी बस (एमएच 06 एस 8428) सकाळी सहा वाजता मनमाडहून शिर्डीकडे जात होती. अनकाई गावाजवळ बस आली असता सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला. त्याचवेळी भुजबळ हे मनमाड होऊन येवला येथे मतदान करण्यासाठी जात होते. त्यांनी अपघातग्रस्त बस पाहताच आपले वाहन थांबवण्यास वाहन चालकाला सांगितले. त्यानंतर ते तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.

YouTube video player

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य पाहून भुजबळ यांनी तातडीने रुग्णवाहिका (Ambulance) बोलविण्याचे आणि पोलीस ठाण्याला माहिती देण्याचे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यानुसार तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिका अपघातग्रस्तांच्या (Accident Victims) मदतीला दाखल झाली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...