Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik News : आज सिंहस्थ आढावा बैठक; डवले घेणार तयारीची माहिती

Nashik News : आज सिंहस्थ आढावा बैठक; डवले घेणार तयारीची माहिती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले (Eknath Dawle) हे मंगळवारी (दि.२८) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित बैठकीत सिंहस्थाच्या तयारीकर विशेष चर्चा करण्यात येणार आहे.गेल्याच आठवड्यात सरकारने एकनाथ डवले यांची पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ते पहिली आढावा बैठक घेत आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात (Hall) सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु झाली आहे. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांसह प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शहराभोवतीचा रिंगरोड, सीसीटीव्ही यंत्रणेची उभारणी व आरोग्य सुविधांवर विशेष चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, येत्या १५ तारखेला मुख्यमंत्र्यांसमवेत (CM) फेरआढावा बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत ठोस भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात सन २०१५ मधील सिंहस्थ नियोजनात विभागीय आयुक्त म्हणून डवले यांची महत्वाची भूमिका होती. आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने डवले यांची पालक सचिव (Guardian Secretary) म्हणून सरकारने नियुक्त केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून रिंगरोडचा आढावा

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी शहराभेधतीच्या ६० किलोमिटरच्या रिंगरोड्या आढावा घेतला. यावेळी बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआडीसी यांनी यापूर्वी सादर केलेला अहवाल समोर ठेवला. त्यातून या मार्गाची निर्मिती कोग व कशी करणार? याचा उलगडा होण्यासाठी मनपासह सर्वांना आज फेरआढावा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकायांनी दिल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...