Thursday, May 14, 2026
HomeनाशिकNashik News : काठे गल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त...

Nashik News : काठे गल्लीतील परिस्थिती नियंत्रणात; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नाशिक | Nashik

नाशिक-पुणे रोडवरील काठे गल्ली (Kate Galli) परिसरातील एका धार्मिक स्थळावरून दोन गट आमनेसामने आले आहेत. याठिकाणी २५ वर्ष पाठपुरावा करूनही महापालिका (Nashik NMC) अनधिकृत धार्मिकस्थळ हटवित नसल्याचा दावा करत हिंदुत्ववादी संघटनानी आज आंदोलनाचा इशारा दिला होता.

- Advertisement -

यानंतर काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात तगडा पोलीस (Nashik Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तसेच परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जटिल होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी मुंबई नाका व भद्रकाली पोलिसांच्या (Mumbai Naka and Bhadrakali Police) हद्दीतील काठे गल्लीसह द्वारका भागात शनिवारी जमावबंदी लागू केल्याचे आदेश पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी जारी केले आहेत.

दरम्यान, आज सकाळपासून परिसरातील दोन्ही बाजूंनी दोन्ही गटांचे लोक जमले असून पोलिसांच्या (Police) कडक बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात (Control) आहे. तसेच या धार्मिक स्थळाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...