Friday, May 29, 2026
HomeनाशिकNashik News: निफाडचा पारा ५.७ अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता

Nashik News: निफाडचा पारा ५.७ अंशावर; द्राक्ष उत्पादकांत चिंता

पालखेड मिरचिचे | वार्ताहर
निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम दिवसेंदिवस वाढत असुन आज शुक्रवार दि.१२ रोजी सकाळी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा ५.७ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.
निफाड तालुक्यात दरवर्षी पारा घसरत असतो. चालु हंगामात ५.७ अंशावर पारा घसरण्याची निचांकी नोंद झाली आहे, त्यामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबणार आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला कडाक्याच्या थंडीमुळे तडे जाण्याचा धोका आहे.

- Advertisement -

घसरते तापमान हे द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढवत आहे, कडाक्याच्या थंडीपासुन द्राक्ष मालाची निगा राखण्यासाठी आवश्यकतेनुसार द्राक्ष बागाईतदारांनी पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनने पाणी द्यावे शिवाय द्राक्ष बागांत शेकोटी पेटवुन धुराद्वारे उष्णता निर्माण करावी अशी महत्वपूर्ण काळजी द्राक्ष बागाईतदारांनी या नैसर्गिक संकटापासुन द्राक्षमाल वाचविण्यासाठी घ्यावी असे अवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एसआयआर मोहिमेची पूर्व तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत...