Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : दहा वर्षीय मुलीची आत्महत्या; मोबाईलमुळे कुटुंब रागावल्याने घेतला...

Nashik Suicide News : दहा वर्षीय मुलीची आत्महत्या; मोबाईलमुळे कुटुंब रागावल्याने घेतला गळफास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साेशल मिडीयासह (Social Media) माेबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. नाशिकराेडच्या (Nashik Road) सामनगावात अवघ्या दहा वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ५) उघडकीस आली आहे. 

- Advertisement -

रुक्ख्मिनी संपत काळे असे मृत बालिकेचे नाव असून नाशिकराेड पाेलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) आकस्मिक मृत्युची नाेंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समाेर आले नसले तरी ती सतत माेबाईल पाहत हाेती. त्यातून कुटुंब रागावल्याने तिने हे पाऊल उचचले असावे, असा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. रुक्ख्मिनी (रा. जुन्या मारुती मंदिराजवळ, सामनगाव, नाशिकराेड) ही पाचवी इयत्तेत शिक्षण घेत हाेती. शुक्रवारी दुपारी आई वडील माेलमजुरीसाठी गेले असतानाच, तिने घरात असताना दुपारी दाेरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

YouTube video player

दरम्यान, काही तासांनी हा प्रकार लक्षात येतात, वडील संपत यांनी तिला बिटकाे रुग्णालयात (Hospital) दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घाेषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत असून तपास हवालदार अनिल पवार करत आहेत. सध्या अल्पवयीन मुले -मुली काहीतरी कारणांतून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याने समाजमनांत चिंतेचा विषय ठरताे आहे. 

जाबजबाब नाेंदविणार

नाशिकराेड पाेलिसांनी पंचनामा करुन उत्तरीय चाचणीनंतर मृतदेह कुटुंबाकडे साेपविला. दरम्यान, पुढील काही दिवसांत पाेलीस रुक्ख्निनीच्या कुटुंबाचे जबाबजबाब नाेंदविणार आहेत. तसेच, माेबाईलची पडताळणी केली जाणार आहे. माेबाईचे व्यसन आणि त्यातून रागावल्याने तिने हे पाऊल उचलले की अन्य दुसरे काही कारण आहे, याचा तपास आकस्मिक मृत्यूच्या नाेंदीनुसार केला जाणार आहे. 

मुले… मोबाईल… चिंता

मुले आणि मोबाईलचे व्यसन हा दिवसेंदिवस चिंताक्रांत हाेत चाललेला विषय आहे. फोनच्या अती वापरावरून रोखले की लहान मुले खूप टोकाला जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत, ही त्या कुटुंबासाठी आणि सर्व समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. मुलांच्या महत्त्वाच्या, जडणघडणीच्या वर्षात मोबाईल फोनचा अतिरेक मुलांच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे. मात्र मुलांना मोबाईल फोनपासून लांब ठेवणे हे आवश्यकच आहे. 

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...