Wednesday, February 4, 2026
HomeराजकीयNashik News : ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कारण...

Nashik News : ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; कारण काय?

नाशिक | Nashik

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या आगामी सिंहस्थाच्या
पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंत यांच्यासोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी सिंहस्थाच्या तारखांची घोषणा केली. त्यानंतर विविध कार्यक्रमांना फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तसेच आज (सोमवारी) त्यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी होते.

- Advertisement -

दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील नाशिक दौऱ्यावर असून, ते पक्षाचे पदाधिकारी विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या मुलीच्या लग्नासाठी हजेरी लावणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील या विवाह सोहळ्यासाठी नाशकात येणार आहेत. या दोन्ही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये आज नेत्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर लगेचच बडगुजर यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

YouTube video player

यावेळी बोलतांना सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. मी त्यांच्याकडे कालपासून भेटीसाठी पाच मिनिटांची वेळ मागितली होती. यानंतर त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली. त्या वेळेनुसार मी निवेदन देण्यासाठी फडणवीसांना भेटलो. यावेळी त्यांना आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे, अशा आशयाचे निवेदन दिले, असे त्यांनी सांगितले.

तसेच  “मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार हे संजय राऊत यांच्यासह सर्वांना माहिती होते”, असेही बडगुजर यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा हॉस्पिटलचे (Saibaba Hospital) उद्घाटन केल्यानंतर समारंभाच्या वेळी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

ताज्या बातम्या

Nashik News : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...