पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
गोदावरी नदीला (Godavari River) आलेल्या पुरामुळे रामकुंड येथील गांधी तलाव परिसरात अडकलेल्या दोन जणांची स्थानिक जीवरक्षक दल, पंचवटी विभागीय अग्निशमन दल आणि आदिवासी जीवरक्षक दलाने धाडसी बचावकार्य करून सुखरूप सुटका केली. बोट, लाईफ रिंग आणि दोराच्या साहाय्याने हे बचावकार्य यशस्वी करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये शर्मा (नेपाळचे रहिवासी) तसेच लोकेश शिवाजी शिंदे (वय ७१, रा. म्हैसूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे. दोघांनाही सुखरूप बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हे देखील वाचा : Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी, तीन वाजेनंतर धोकादायक परिस्थितीची शक्यता
या बचाव मोहिमेत पंचवटी विभागीय (Panchavati Divisional) अग्निशमन दलाचे संजय कानडे, बाळासाहेब लहमगे, सुनील शिलावट, प्रथमेश वाघ, अक्षय गांगुर्डे, प्रसाद पळसेकर, प्रणय बनकर, रुशी जाधव, गणेश रकीबे, राहुल अहिरे, किशोर पाटील, दिनेश लासुरे, भीमराव खोडे, इसाक शेख, अभिषेक बैरागी तसेच चालक अभिजीत देशमुख, सुदाम सोनवणे आणि बाळासाहेब काकडे यांनी सहभाग घेतला.
याशिवाय आदिवासी जीवरक्षक दल, रामकुंड, नाशिक महानगरपालिकेचे (Nashik NMC) स्वच्छता निरीक्षक गणेश तांबे, आसिफ पठाण, अनिल नेटवते, लक्ष्मण, पांडुरंग जाधव, सुनील देविदास बोरसे, संतोष दिवे, शंकर माळी, दुर्गेश वाघमारे आणि सुधीर सहाणे यांनीही बचावकार्यात मोलाचे योगदान दिले. वेळीच आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या बचाव मोहिमेमुळे दोघांचे प्राण वाचले असून, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि जीवरक्षक पथकांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशिकमध्ये रात्रभर जोरदार पाऊस; गोदावरीला पूर, रामकुंडावरील मंदिरे पाण्याखाली




