त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
तालुक्यातील हरिहर किल्ल्यावरील (Harihar Fort) पर्यटन यावर्षी मोठ्या गर्दीत (Crowd) उत्साहात पार पडले. परंतु, दुर्दैवाने आज (शनिवारी) भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) एका तरुणाचा दरीत (Gorge) कोसळून मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष टीकाराम समरीत (वय २९, रा. खमारी, जि. भंडारा) हा त्याच्या २०
साथीदारांसोबत पर्यटनासाठी (Tourisam) आला होता. काल (शुक्रवारी) त्यांनी कळसुबाई शिखर पूर्ण केला. यानंतर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ते हरिहर किल्ला येथे ट्रेकिंगसाठी आले होते.
यावेळी सदर ठिकाणाहून उतरत असताना सुमारे १२ वाजेच्या सुमारास आशिष समरीत याचा तोल जाऊन तो साधारण शंभर फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला. यानंतर वनविभाग व स्थानिक गावकरी यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, यावेळी पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





