Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News : साल्हेर किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nashik News : साल्हेर किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

साल्हेर | वार्ताहर | Salher

येथील साल्हेर किल्ल्यावर (Salher Fort) रविवार (दि.१२ रोजी) पहाटे ५ वाजेच्या सुमारास गुजरातमधून १३ ते १४ पर्यटक हे ट्रेकिंगसाठी आले होते. सर्व पर्यटक (Tourist) किल्ल्यावर चढत असताना ते परशुराम मंदिरापर्यंत पोहचले. त्यांच्यातील भाविन कुमार चंपक भाई पटेल (वय ३१,रा.सिंनदाई वगई) हा पर्यटक दम लागल्याने मागेच विश्रांती घेत होता. यावेळी त्याला भुरळ आल्याने तो जागीच कोसळला. त्यानंतर सकाळी साडे आठच्या सुमारास नाशिकहून आलेले पर्यटक किल्ल्यावर चढत होते, त्यावेळी त्यांना पटेल हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

- Advertisement -

यानंतर त्यांनी त्याचे फोटो खाली असलेले नाशिकच्या पर्यटकांच्या (Nashik Tourist) ड्रायव्हरकडे व्हाट्सॲप केला. ड्रायव्हरने स्थानिक मधुकर भोये, भास्कर बच्छाव, शांताराम मोरे यांना माहिती दिल्याने त्यांनी तात्काळ पोलीस पाटील सुभाष ठाकरे यांना कळवून जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना माहिती दिली. यानंतर पुरातन विभागाच्या साल्हेर किल्ला देखरेखसाठी असलेले शांताराम मोरे, वनविभागाचे शिपाई सतीश बहिरम, हिरामण भोये, युवराज भोये यांच्यासह आदी स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविन कुमार चंपक भाई पटेलला उपचारासाठी (Treatment) किल्ल्यावरून खाली उतरवले.

YouTube video player

दरम्यान, यावेळी किल्ल्याच्या पायथ्याशी साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाठक, डॉ. अभिजीत सोनजे यांनी भाविन कुमारची तपासणी केली असता त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात (Jaykheda Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश क्षीरसागर, पृथ्वीराज बारगळ, योगेश साळुंखे करीत आहे.

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...