ओझर | वार्ताहर | Ozer
आपल्या विविध मागण्यांकरिता शासकिय आश्रम शाळेतील रोजंदारीवर असलेल्या शिक्षकांनी (Teachers) सोग्रस फाटा ते आदिवासी भवन पायी बिऱ्हाड मोर्चा (Birhad Morcha) काढला आहे. सरकार आम्हाला खेळवत असून, प्रत्येकवेळी आश्वासनावर आमची बोळवण करत आहे. परंतु. आता आम्ही माघार घेणार नाही वेळप्रसंगी आत्मदहन करू पण मागण्या तडीसच नेऊ असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
आदिवास विकास खात्याअंतर्गत (Tribal Department) येणाऱ्या शासकिय आश्रम शाळेतील रोजंदारी वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभागाच्या शासकिय आश्रम शाळेतील शिक्षकांची १७९१ पदे बाहेरील खाजगी एजन्सी मार्फत भरण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, रोजंदारी तासिका वर्ग तीन व चार कर्मचारी यांचे विशेष बाब म्हणून विना अट थेट समायोजन करावे, रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्याचे मयत संवर्गातील पदे तात्काळ जीवित करावे यासह आदी मागण्यांसाठी सोग्रस फाटा ते आदिवासी विकास कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला आहे.
आज (रविवारी) हा मोर्चा ओझर (Ozer) येथे दाखल झाला. यानंतर दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर साकोरा फाटा येथे मोर्चेकऱ्यांनी अचानक महामार्गावर चक्का जाम आंदोलन (Agitation) केल्याने काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी मोर्चक-यांसाठी मुंबई आग्रा महामार्गावरील एक बाजु वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने वाहतुक संथ गतीने सुरू होती.आपल्या मागण्या मांन्य न झाल्यास वेळ प्रसंगी आत्मदहन करण्याचा इशारा ललितकुमार चौधरी यांनी दिला.
सरकार नेमकं चालवतो कोण हा खरा प्रश्न
आदिवासी आश्रम शाळेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षक प्रतिनिधी आदिवासी मंत्री यांच्यात मध्यंतरी मंत्रालयात एक बैठक झाली. या बैठकीत आदिवासी मंत्री आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक होते. परंतु, आदिवासी विकास विभागाचे सचिवांनी याच बैठकीत आमच्या मागण्यांबाबत नकार घंटा वाजवत मंत्री महोदयांना देखील मागण्या मांन्य होऊ शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सरकार नेमके कोण चालवते आणि आदिवासी लोकप्रतिनीधी सरकारच्या हातातले बाहुले आहे का? असा संतप्त सवाल ललितकुमार चौधरी यांनी केला.




