Sunday, January 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मुख्यमंत्री फडणवीस यांची आज जाहीर सभा; गोदाघाटावर वाहतूक मार्गात...

Nashik News : मुख्यमंत्री फडणवीस यांची आज जाहीर सभा; गोदाघाटावर वाहतूक मार्गात बदल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीतील (Mahapalika Election) भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची जाहीर सभा रविवारी (दि.११) दुपारी तीन वाजता गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण येथे होणार आहे. त्यासाठी नाशिक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून, रामकुंड परिसर व आजूबाजूच्या भागात वाहतूक मार्गात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सभास्थळी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे निर्बंध सकाळी ६ वाजेपासून सभा (Public Meeting) संपेपर्यंत लागू असतील. सभास्थळाकडे येणाऱ्या प्रमुख मार्गांवर बॅरिकेडिंग करून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून, काही मार्ग पूर्णतः बंद तर काही मार्गावर पर्यायी व्यवस्था लागू असेल.

YouTube video player

पर्यायी मार्ग :- वाहनधारकांनी पंचवटी कारंजा-दिंडोरी नाका-काट्या मारुती-गणेशवाडी-गौरी पटांगणमार्गे जावे. तसेच सरदार चौककाडून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनी गणेशवाडी-नागचौकमार्गे जावे व यावे. तसेच शनिचौक ते सरदार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी काट्या मारुती चौक-गणेशवाडी-गौरी पटांगणमार्गे जातील व येतील.

येथे बॅरिकेडिंग

ढिकले वाचनालय, मालेगांव स्टॅण्ड, म्हसोबा पटांगण, खांदवे सभागृह, काळाराम मंदिर, शनिचौक.

प्रवेश बंद मार्ग असे

१) ढिकले वाचनालय ते रामकुंड
२) मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड हे दोन्ही मार्ग
३) म्हसोबा पटांगण ते रामकुंड हे दोन्ही मार्ग
४) खांदवे सभागृह ते रामकुंड
५) सरदार चौक ते काळाराम मंदिर
६) शनिचौक ते सरदार चौक

ताज्या बातम्या

Ambadas Danve : छ. संभाजीनगरमध्ये माजी नगरसेवकाची गुंडगिरी दानवेंकडून मारहाणीचा धक्कादायक...

0
संभाजीनगर। Chhatrapati Sambhajinagar शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक व्हिडीओ पोस्ट केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात...