येवला | प्रतिनिधी | Yeola
शेतात (Farm) जनावरांसाठी मका कापत असताना शेतकऱ्यावर (Farmer) बिबट्याने हल्ला (Attack) केल्याची घटना तालुक्यातील खिर्डीसाठे येथे घडली आहे. या हलल्यात दोघे जखमी झाले आहे. तर परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी गणेश श्रावण मोरे हे शेतात जनावरांसाठी (Animals) मका कापत होते. यावेळी अचानक आलेल्या बिबट्याने मोरे यांचेवर हल्ला केला. मोरे आणि बिबट्या यांचेत झटापट झाली. या दरम्यान बिबट्याने (Leopard ) त्यांचा लहान मुलगा सजन मोरे यांचेकडे आपला मोर्चा वळवत हल्ला केला. दरम्यान, जखमी गणेश मोरे यांनी आरडाओरड केली असता जवळील शेतात पाणी भरत असणाऱ्या बबन भिकाजी इप्पर यांनी धाव घेत मोरे यांची सुटका केली. तर आवाजामुळे बिबट्याने धूम ठोकली. सदर घटना बुधवारी, (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, जखमी गणेश मोरे, सजन मोरे यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Center) दाखल करण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.