Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Suicide News : शहरात दोघांच्या आत्महत्या

Nashik Suicide News : शहरात दोघांच्या आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वाणिज्य शाखेत तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास (Hanging) घेऊन जीवन संपवले. जयश्री प्रवीण सूर्यवंशी (१९, रा. गिरणीजवळ, प्रोफेसर कॉलनी, हनुमानवाडी, पंचवटी) असे मृत विद्यार्थिनीचे (Student) नाव आहे. तिने आत्महत्या का केली याचा तपास आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

जयश्री ही (दि. २) घरी होती. तिने दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ओढणीने गळफास घेतला. ही घटना तिचे मावस काका लक्ष्मण विराडकर यांना काही वेळाने लक्षात येताच तिला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल केले. मात्र डॉ. गावित यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार दत्तात्रय शेळके करत आहेत.

दरम्यान, जयश्रीने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध घेतला जात असून घरात सुसाईड नोट आढळून आलेली नाही. आता नातलगांसह तिच्या मैत्रिणींकडे चौकशी व तांत्रिक विश्लेषणाच्या तपासानंतरच तिच्या मृत्यूचे (Death) कारण समोर येणार आहे.

मद्याच्या नशेत आत्महत्या

नशेत असतानाच विषारी औषध सेवन केल्याने राजू सुकदेव ताठे (वय २५, रा. महादेववाडी, सातपूर) याचा मृत्यू झाला. याबाबत सातपूर पोलिसांत (Satpur Police) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्याने (दि. १) दुपारी तीन वाजता अमलाखाली असताना काहीतरी कारणातून विष प्राशन केले. त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने भाचा अक्षय शिंदे याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपास हवालदार किशोर बेंडकुळे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...