Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : ईदगाह मैदानाजवळ झाड कोसळले; वाहनांचे नुकसान

Nashik News : ईदगाह मैदानाजवळ झाड कोसळले; वाहनांचे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पावसामुळे (Rain) आज (सोमवारी) सकाळी ईदगाह मैदानाजवळ (Eidgah Maidan) एक झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, झाडाखाली उभ्या असलेल्या चार ते पाच मोठ्या वाहनांवर (Vehicles) अचानक झाड कोसळले. यामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या (NMC) आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. सध्या वाहने हटवून झाड तोडत रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

राज्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण दिन

0
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे तसेच गोवर-रुबेला निर्मूलन आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम...