Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Yeola News : येवल्यात मतदानासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज; ४६ केंद्रांवर होणार...

Nashik Yeola News : येवल्यात मतदानासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज; ४६ केंद्रांवर होणार मतदान

येवला | प्रतिनिधी | Yeola

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या (Nagarparishad Election) पार्श्वभूमीवर मतदानासाठी (Voting) यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली. 

- Advertisement -

येवला शहरातील (Yeola City) सर्व ४६ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, केंद्राध्यक्ष ४६ , सहाय्यक मतदान अधिकारी १३८, मतदान शिपाई ४६ तसेच पोलीस शिपाई ४६, सेक्टर अधिकारी ७ मतदान साहित्यांसह आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. नगरपालिका प्रशासनाच्या उपस्थितीत सकाळी, सर्व मतदान कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंद घेण्यात आली.

YouTube video player

त्यानंतर प्रत्येक केंद्रासाठी आवश्यक असलेले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, मतदार यादी, आवश्यक फॉर्म्स व नोंदवही, इंडेलिबल शाई, सील, टॅग, स्ट्रिप सील, केंद्र सज्जता साहित्य यांचे वाटप करण्यात आले. सर्व उपकरणांची तपासणी व सील पडताळणी करून केंद्राध्यक्षांकडून स्वाक्षरी घेण्यात आली. यावेळी शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियुक्त पोलीस (Police) शिपाई यांनाही स्वतंत्र दिशानिर्देश देण्यात आले. 

दरम्यान , उद्या, मंगळवारी (दि. २) होणाऱ्या मतदानासाठी सर्व केंद्रे वेळेत व्यवस्थित सुरू राहावीत यासाठी निवडणूक आयोगाच्या मानक कार्यपद्धतीनुसार सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तुषार आहेर यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

उमेदवाराच्या ओल्या पार्टीत ‘चखण्यावरून’ वाद?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असतानाच, एका इच्छुक उमेदवाराच्या ‘ओल्या पार्टी’तून वाद निर्माण झाल्याची चर्चा सध्या...